29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूरदहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणा-या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.  लातूर विभागीय मंडळस्तरावर इयत्ता दहावीसाठी ०२३८२-२५१६३३ तर  इयत्ता बारावीसाठी ०२३८२-२५१७३३  ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए. आर. (सहाय्यक सचिव)  मो. नं. ९४०५०७७९९१, उच्च माध्यमिक (बारावी) साठी कारसेकर जे. एस. (व. अ.) मो. नं. ९८२२८२३७८०, डाळींबे एम. यु. (प. लि.) मो.नं. ९४२३७७७७८९, जानकर एच. एस. (व. लि.) मो. नं. ९७६४४०९३१८ आहेत.  माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो. नं. ९४२०४३६४८२, घटे एस. एच. (प.लि.) मो.नं. ९४०५४८६४५५, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो. नं. ७६२०१६६३५४ हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत साधावा.
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु- मार्च २०२५ या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. लातूर जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. वारद जे. एम. (भ्रमणध्वनी क्र. ९८५०६९५३०३), दानाई एम. एस. (भ्रमणध्वनी क्र. ९४२२०१५१५२), जाधव ए. एम. (भ्रमणध्वनी क्र. ९४२१३७९९११), वांगस्कर एम. एन. (भ्रमणध्वनी क्र. ९४२०८७२८८४). लातूर, नांदेड व धाराशिव या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.
विभागातील तीन्ही जिल्ह्यांतून बारावीच्या २४९ केंद्रांवरुन एकुण १२ वीचे ९५ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.  बारावीच्या परीक्षेस ९५ हजार ६७९ विद्यार्थी बसणार आहेत. हे विद्यार्थी नांदेडमधील ३४६, लातूरमधील ३७२ तर धाराशिवमधील १८१ अशा एकुण ८९९ महाविद्यालयातील आहेत., असे लातूर विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR