लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या ७५ व्या वाढदिवस निमित्तााने शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांनी शहरातील विशालनगरमधील साई मंदीरात श्री साईंचे दर्शन घेतले. लातूर शहरातील विलशालनगरमधील साई मंदिर, मांजरेश्वर हनुमान मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ. सुवर्णाताई देशमुख यांनी दर्शन घेतले. महापूजा, अभिषेक केला. मनोभावे प्रार्थना करत आशिर्वाद घेतले. यावेळी अनंत गाडे, सौ. गाडे, बळवंत काळे, विकास देशमुख हरिराम कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी साई मंदिर, मांजरेश्वर हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.