22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडादिल्ली कॅपिटल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत आज

दिल्ली कॅपिटल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत आज

नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग २ चा अंतिम सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणा-या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आरसीबी प्रथमच या लीगच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे तर दिल्ली कॅपिटल्स हा सलग दुस-यांदा अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली संघाने एमआयचा पाच धावांनी पराभव केला. तर दिल्ली कॅपिटल्सने आठ सामन्यांत सहा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गेल्या मोसमात जेतेपदाच्या लढतीत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता.

दरम्यान आज होणा-या सामन्यात दोन्ही संघ महिला प्रीमियर लीग २ ची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी खेळतील. अशा परिस्थितीत दोन्ही संघांत अंतिम सामन्यासाठी कोणत्या खेळाडूंना प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू

दिल्ली कॅपिटल्सचे संभाव्य खेळाडू : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संभाव्य खेळाडू : स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR