24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीदिव्यांग उर्जा राज्यस्तरीय पुरस्कार विष्णू वैरागड यांना जाहीर

दिव्यांग उर्जा राज्यस्तरीय पुरस्कार विष्णू वैरागड यांना जाहीर

परभणी : दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय दिव्यांग उर्जा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते विष्णू वैरागड यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाईचा पायथा मंदिर माची ता. आकोले जि. अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.

शिवुर्जा प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दरवर्षी दिव्यांग, दिव्यांग संस्था व दिव्यांगासाठी काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय दिव्यांग उर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी परभणी शहरातील रहिवासी असलेले व दिव्यांग पुनर्वसनासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विष्णू रामभाऊ वैरागड यांना दिव्यां उर्जा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. १ जानेवारी रोजी कळसुबाई पायथा मंदिर माची ता. आकोले जि. अहमदनगर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ. डॉ. राहूल पाटील, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, जि.प. अपंग विभाग प्रमुख प्रल्हाद लांडे, कास्ट्राईब दिव्यांग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अलोने, सचिव प्रकाश जाधव, सुभाष मोरे, गोपीनाथ घनघाव, रितेश लासे, प्रकाश पेडगावकर, मुंजाजी बुनगे, एम.एस. चव्हाण, सत्यम दिव्यांग संघटना अध्यक्ष संजय वाघमारे, आरपीआय दिव्यांग संघटना मराठवाडा अध्यक्ष राहुल शिवभगत, ज्ञानोबा कदम, प्रदीप गांधारे, गजानन मस्के, नरसिंग भोसले आदिंसह नातेवाईक, मित्रमंडळीनी आदिंनी श्री. विष्णू वैरागड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR