देवणी : वार्ताहर
तालुक्यात विविध भागांमध्ये रविवार १२ मे रोजी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळासह पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. जवळपास एक तास पाऊस बरसला.या पावसामुळे बागायत शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. अंबा, पपई, डाळींब या फळबागांचे नुकसान झाले.
विजांचा कडकडाटासह झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांच्या भिंतींचे नुकसान झाले. होत्या. तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अवकाळी पावसात जीवनावश्यक साहित्य भिजले. तसेच या वादळी वा-यासह पावसाचा फटका बागायती पिकांना बसला आहे. तालुक्यात बागायती शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, येथे गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अंबा, पपई ,डांिळब,भाजीपाल्यात कोंिथबीर, टोमॅटो, कांदा पिकांची नासाडी झाली आहे.तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह पाऊस पडत असून त्यासोबत गारपीटही होत आहे. तालुक्याला गारपीटीचा तसेच वादळी वा-याचा मोठा फटका बसला, आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला आहे.