21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल

देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकीय ट्रेंडमध्ये ‘देवाभाऊ हॅश टॅग ’देशात अव्वल

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण या त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आतापर्यंत म्हणजेच १९९९ पासून एकही निवडणूक हरलेली नाही. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ‘विजयाचा शंखनाद’ असेल अशी प्रतिक्रिया देत  आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक्सवर देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. एक्सच्या ट्रेंडवर ‘देवाभाऊ हॅश टॅग ’चा जोरदार ट्रेंड असल्याचे समोर आले आहे. राजकीय ट्रेंडमध्ये ‘देवाभाऊ हॅश टॅग ’ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल करताना सोशल मीडियावर देवाभाऊ ट्रेंड चा जोरदार बोलबाला असल्याचे पुढे आले आहे.
फडणवीसांनी मानले आभार
भारतीय जनता पक्षाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांचे मी आभार मानतो. मला सहाव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की सभागृहाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलं आणि सेवाही पाहिलं आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे तेच पुन्हा सत्तेवर येईल हा माझा विश्वास आहे.’

कुटुंबियांकडून औक्षण
यावेळी त्यांच्या घरामध्ये त्यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गडकरींचा घेतला आशीर्वाद
देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्यातील भाजपचे महत्त्वपूर्ण नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरींच्या निवासस्थानी जाऊन फडणवीसांनी आशिर्वाद घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह दक्षिणमधून मोहन मते आणि नागपूर पूर्वीमधून कृष्णा खोपडे असे तीन नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR