22.5 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeलातूर‘देशासाठी माझे पहिले मत’अभियानास प्रतिसाद 

‘देशासाठी माझे पहिले मत’अभियानास प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर, वर्शिप अर्थ फाउंडेशन, लातूर व श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या निवडणूक साक्षरता मंडळाच्या संयुक्त्त विद्यमाने ‘मेरा पहला वोट देश के लिये’,  या मतदार जनजागृती अभियानास प्राचार्य डॉ. अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला असून,  राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा नोडल अधिकारी, प्रा. शिवाजी मोहाळे, प्रा. शंकरराव चव्हाण, निवडणूक साक्षरता मंडळाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मतदान जर जागृती मोहिमेमध्ये काम करीत आहेत.
दि. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च आठवडाभर चालणा-या ‘मेरा पहला वोट देश के लिये’, या अभियानात महाविद्यालयाचे नोडल अधिकारी प्रा. शिवाजी मोहोळ,  प्रा. शंकरराव चव्हाण, निवडणूक साक्षरता मंडळाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका महाविद्यालयाच्या परिसरात व स्वयंसेवक राहत असणा-या परिसरात जाऊन विशेषत: पहिल्यांदाच मतदान करणा-या तरुण मतदारास मतदान करण्यासाठी प्रेरित करुन देश हितासाठी मतदान करणे व त्याचे महत्त्व नव मतदारांना समजावून सांगणार आहे.  आठवडाभर चालणा-या या अभियानात निबंध घोषवाक्य भित्तिपत्रक गीत गायन, पथनाट्य ईत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, प्रा. शिवाजी मोहोळ, प्रा. शंकरराव चव्हाण, निवडणूक साक्षरता मंडळाचे पदाधिकारी पांचाळ श्रीधर, नागेश हजारे, सलीम पटेल, रवी भोजने, राजनंदनी ठाकूर, ऐश्वर्या सूर्यवंशी, भाग्यश्री भालेकर, शहबाज पठाण,  श्रावणी काळे, राकेश सुरवसे आदी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR