23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरद्वारकादास शामकुमार ग्रूपतर्फे शिक्षक दिनानिमित्त उद्या कवी संमेलन

द्वारकादास शामकुमार ग्रूपतर्फे शिक्षक दिनानिमित्त उद्या कवी संमेलन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय शिक्षणाचा कणा असना-या जिल्ह्यातील सर्व गुरुजांचा गेली अनेक वर्षे  शिक्षक दिनानिमित्त द्वारकादास शामकुमार ग्रुप व तुकाराम मित्र मंडळच्या वतीने मराठवाड्यातील सर्व शोरुममध्ये सत्कार केला जातो. विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्दात हेतूने येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्या दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सर्व गुरुजांच्या सन्मानार्थ कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्रतील ख्यातनाम कवी अनंत राऊत, अंकुश आरेकर, रवींद्र केसकर, यामिनी दळवी, शिल्पा देशपांडे उपस्थित राहणार असून  आपल्या देशाची पुढील पिढी घडविणा-या शिक्षकांमुळेच लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा गवगवा हा राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात होतो. त्यामुळे शिक्षण देणा-या गुरुजनांच्या सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  तरी या कवी संमेलन सोहळ्यास  जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी, गुरुजनांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन द्वारकादास शामकुमार ग्रुपचे तुकाराम  पाटील,  तसेच तुकाराम पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR