26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeपरभणीधनगर समाज बांधवाच्या वतीने रास्तारोको आंदोलन

धनगर समाज बांधवाच्या वतीने रास्तारोको आंदोलन

पालम : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीची अंमलबजावणी करण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प होवून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा पहावयास मिळाल्या. यावेळी आंदोलकांच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एसटी प्रवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. त्यासाठी पंढरपूरसह अन्य ठिकाणी बेमूदत उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ सोमवार, दि.२३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सकल धनगर समाजाची बैठक घोरपडे गल्लीतील समाज मंदिरात झाली.

तदनंतर रास्तारोकोच्या ठिकाणापर्यंत सवाद्य मोर्चा काढला. पालम ते लोहा रोडवरील पेठपिंपळगाव चौकात उपस्थित मान्यवरांनी भाषणे केली. तोपर्यंत पालम ते राणीसावरगाव, पालम ते परभणी रोड आणि पालम ते गंगाखेड, पालम ते लोहा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या विनंतीने सदर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन सादर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR