31.9 C
Latur
Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्रधुळ्यात भाजपाचा प्रचार रथ जळून खाक

धुळ्यात भाजपाचा प्रचार रथ जळून खाक

धुळे : लोकसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरू असताना धुळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यात भारतीय जनता पक्षाचा प्रचार रथ जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिल्लीतून हा प्रचार रथ धुळ्यात दाखल झाला होता. बॅटरीत बिघाड झाल्याने अचानकपणे आग लागून रथ जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देशभरात तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच धुळ्यातील भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिल्लीहून धुळ्यामध्ये प्रचार रथ पाठवण्यात आला होता.मात्र, बुधवारी मध्यरात्री अचानकपणे या प्रचार रथाला आग लागली. या आगीत भाजपचा प्रचार रथ पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली. बॅटरीमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आली आहे.

भाजपचा प्रचार रथ बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हे वाहन नक्की बॅटरी बिघाड झाल्याने जळाले की कोणी खोडसाळपणे आग लावली, अशा चर्चेला सध्या शहरात अक्षरश: ऊत आला आहे. या घटनेवर भाजपचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR