39.5 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपुणेकरांचे मतदानाचे कर्ज विकासाच्या रूपाने परत करेन

पुणेकरांचे मतदानाचे कर्ज विकासाच्या रूपाने परत करेन

मुरलीधर मोहोळ यांचा मतदारांना शब्द

पुणे : पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी महायुतीने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. त्यासाठी महायुतीचे मोठे नेते त्यांच्या रॅलीत सहभागी झाले.

दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी माहोळ यांनी, पुणेकरांचे मतदानस्वरूप कर्ज, विकास कामांच्या रूपात व्याजासह परतफेड करणार असा शब्द पुणेकरांना दिला.

आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली काढली. यावेळी प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी, ‘‘पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याची संधी मला मिळत आहे, याचे मला समाधान आहे. मताधिक्य मिळणे किंवा निवडणूक जिंकणे यापेक्षा महत्त्वाचे आहे की, त्यानंतर मिळालेल्या जबाबदारीचे भान आतापासून आहे, असे त्यांनी म्हटले.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, प्रत्येक पुणेकर मतदारांची काहीतरी अपेक्षा आहे. आज पुणेकर कर्ज स्वरूपात मला मतदान करतील. मी त्यांच्या अपेक्षा, कर्ज हे कामाच्या स्वरूपातून व्याजासहित परत करणार आहे. रॅलीच्या समारोपानंतर जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

वंचितचे उमेदवार वसंत मोरे आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक असताना ज्या त्या प्रभागात चांगली कामे केली आहेत. पण ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठा विचार करणार आहेत. देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाला पाठवायचे आणि आपला माणूस कोण याचा विचार करणार आहेत. देशाचे प्रतिनिधित्व हे मोदीजीच करणार आहेत आणि पुणेकर निश्चितच महायुतीचा उमेदवार निवडून देतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR