अमरावती : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे नेते बळवंत वानखडे यांचा विजय झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, पराभवामागे रवी राणा यांचा मोठा हात आहे. रवी राणा यांची वर्तणूक, त्यांनी प्रत्येकासोबत केलेले वाद. काहीजण आपल्या कर्माने पडतात, त्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. या सगळ्या वातावरणामध्ये दिनेश बूबसारखा चांगला कार्यकर्ता आम्हाला भेटला. असे बच्चू कडू म्हणाले.