26.5 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रनवरा-बायको राजकारणातले बंटी-बबली

नवरा-बायको राजकारणातले बंटी-बबली

नवनीत राणांवर आनंद अडसुळांची खोचक टीका

अमरावती : अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांची उमेदवारी आणि आनंद अडसुळांचा तीव्र विरोध यामुळे कमालीची रंगत निर्माण झाली आहे. २०१४मध्ये आनंद अडसुळांचा नवनीत राणांनी पराभव केला होता.

तेव्हापासून या दोघा नेत्यांमध्ये कमालीचा विरोध पाहायला मिळत आहे. त्यातच यावेळी नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अमरावतीची उमेदवारी त्यांना जाहीर करण्यात आली. त्यामुळे आनंद अडसूळ यांनी त्याला विरोध केला असताना आज राणा दाम्पत्य थेट अभिजित अडसूळ यांच्या घरी भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमरावतीत अडसूळ विरुद्ध राणा हा वाद काही नवीन नाही. पण पहिल्यांदाच अडसूळ आणि राणा यांच्यात सख्य पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्य रामनवमीच्या निमित्ताने आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांच्या भेटीला गेले. त्यानंतर अभिजित अडसूळ यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो. ही लढाई देशाच्या पंतप्रधानांसाठी चालू आहे.

४०० पारचा आकडा आपण निश्चित केला आहे. मोदींसाठी सगळे लढण्यासाठी तयार आहेत. यासंदर्भात आम्ही चर्चा करू आणि त्यातून काहीतरी सकारात्मक येईल, असे अभिजित अडसूळ माध्यमांना म्हणाले.

‘ही महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आहे. आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर आपण त्यांचं स्वागत करतो. आज रामनवमीच्या निमित्ताने रवी राणांकडून मेसेज आला की ते दोघे भेटायला येत आहेत. ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांचे आदरातिथ्य केले आहे, असेही अभिजित अडसूळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR