25.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeराष्ट्रीयनववर्षाचे जल्लोषात स्वागत

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

सर्वत्र रोषणाई, मुंबईत जुहू चौपाटीवर प्रचंड गर्दी, देशभरही उत्साह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरत्या वर्षाला निरोप देताना जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नव्या वर्षात नवे संकल्प घेऊन भारतातही २०२४ ला गुडबाय करीत २०२५ चे जंगी स्वागत केले. यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईच्या जुहू चौपाटीवर दाखल झाले होते. या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जागतिक स्तरावर सर्वांत अगोदर न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी रोषणाई आणि आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

देशभरात विविध ठिकाणी नागरिकांनी गर्दी करून ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ठिकठिकाणी रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. त्याचवेळी शुभेच्छांचा वर्षावही सुरू झाला. मुंबईत मुंबईकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी जुहू चौपाटीला मोठी पसंती दिली. मुंबईच्या वेगवेगळ््या भागातून मोठ्या संख्येने पर्यटक जुहू चौपाटीवर दाखल झाले होते. त्यामुळे जुहू चौपाटीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेला बाधा होऊ नये, यासाठी साध्या ड्रेसमध्ये महिला पोलिस अधिकारी, कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. २०२४ च्या अखेरच्या सूर्यास्ताला आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी जुहू चौपाटीवर पर्यटकांची मोठी गर्दी जमली होती. पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पावरही २०२४ च्या अखेरच्या दिवसाच्या सूर्यास्ताला निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती. दरम्यान, रात्री जुहू चौपाटीवर नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. यावेळी जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले.

प्रथम न्यूझीलंडमध्ये
नववर्षाचे स्वागत
जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जोरदार आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जगात सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये नवीन वर्ष सुरू झाले. तेथे मोठ्या थाटामाटात जल्लोष करण्यात आला. यावेळी डोळे दीपवणारी आतिषबाजीही करण्यात आली. या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR