नांदेड : प्रतिनिधी
शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीत कुल सी एल आय प्रॉडक्ट लँड मार्केटिंगच्या दुकानाला मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान आग लागली. महानगरपालिकेच्या पाण्याच्या ३ बंबाने आग आटोक्यात आणली.
तीन मजली इमारतीच्या खालच्या तळमजल्यात इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल वस्तू विक्रीचे दुकान आहे. दुकानाला अचानक आग लागल्याने लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे.
दुपारी दोन वाजेपर्यंत आग आटोक्यातआली. त्यामुळे पुढे पुढील अनर्थ टळला असून सदर आग कशामुळे लागली ही अद्याप स्पष्ट झाले नाही .दुकान मालक इकबाल अहमद खान यांनी सदर घटनेबाबत महापालिका व पोलिसांना तात्काळ माहिती दिली आहे.