25.4 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeनांदेडनांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के

नांदेड/हिंगोली : प्रतिनिधी
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना मंगळवारी (२२ऑक्टोबर ) सकाळी ०६:५२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यासंदर्भात जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानेही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर ३.८ एवढी नोंदवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, भूकंपाचा केंद्रंिबदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव येते होता. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित वा वित्त हानी नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली असल्याचे नांदेडमधील जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव या तालुक्यांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वीही ४.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. गत सह ते सात वर्षापासुन सतत वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यास सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्यामुळे नागरीकांत भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी नांदेड जिल्ह्यात भूकंप झाला आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा, पिंप्राळा ,डोणवाडा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..
तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे. अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वसमतचे तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR