23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरनाथ संस्थानची माघवारी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

नाथ संस्थानची माघवारी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

औसा : प्रतिनिधी
येथील संत वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानची माघवारी पायी ंिदडी रविवारी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे  हरिनामाच्या गजरात मार्गस्थ झाली. गोपाळपूर येथील ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या समाधी मंदिरापासून दुपारी तीन वाजता पीठाधिपती सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली निघालेल्या या ंिदडीत हजारो भाविक भक्त,संस्थानचे शिष्यगण व वारकरी सहभागी झाले होते.
ंिदडी   येथील गांधी चौकात येताच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अजिंंक्य रणदिवे, सचिन माळी, बेलेश्वर कल्याणी यांनी सदगुरु गुरुबाबा महाराज,  ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, श्रीरंग महाराज व ज्ञानराज महाराज यांचे स्वागत केले. शहरात ठीक-ठिकाणी महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. पालखीसोबत मच्छीद्रनाथ महाराज, गोरखनाथ महाराज, रवींद्र महाराज, विठोबा वैजवाडे, अजित मुसांडे,गिरीश पाटील, काशिनाथ सगरे, चंदर पाटील, सदानंद शेटे, गोंिवद माकणे, संतोष सोमवंशी यांच्यासह हजारो भाविक भक्तांनी ंिदडीस शुभेच्छा दिल्या. जवळपास अडीचशे वारकरी दिड्याचा पालखीसोबत समावेश असून  हजारो महिला व युवक सहभागी झाले होते .शहरातील रस्ते भाविकांनी भरले होते. .ंिदडीच्या आजचा पहिला मुक्काम बोरफळ येथे असून १८  फेब्रुवारी ंिदडी पंढरपूर येथील चंद्रभागेच्या औसेकर महाराज फडावर स्थीरावणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR