20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या नांदगावमध्ये राडा

नाशिकच्या नांदगावमध्ये राडा

कांदेंची भुजबळांना धमकी; नांदगावात मोठा राडा

नाशिक : प्रतिनिधी
तुझा मर्डर फिक्स… असे म्हणत आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिली आहे. नाशिकच्या नांदगावात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यभरात मतदार मतदान केंद्रावर जात मतदान करत आहेत.

नाशिकमध्येही मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले आहेत. अशातच सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. यावेळी नाशिकच्या नांदगावमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स…., असे म्हणत धमकी दिली आहे. नांदगावमधील हा राडा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे.

नांदगावमध्ये हायहोल्टेज ड्रामा
सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले आहे. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावरील प्रकार आहे. यावेळी दोन्ही गटांत जोरदार राडा पाहायला मिळाला. गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघाले होते. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सुहास कांदे काय म्हणाले?
नांदगावमध्ये झालेल्या राड्यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही ऊसतोड कामगार राज्यभर कामासाठी साखर कारखान्यावर कामाला जातात. ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने एकत्रित जेवणाची व्यवस्था केली होती.समीर भुजबळ आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. त्यांच्या गाड्याही अडवल्या आणि फोडल्या. ही माहिती मिळताच मी त्या ठिकाणी पोहोचलो, असे सुहास कांदे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR