23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृ्त्यू

नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृ्त्यू

नाशिक : नाशिकमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर आज (२१ जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ हा अपघात घडला. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांनी जखमींना मदत करत तातडीने रुग्णालयात पोहोचवले. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे तपासाअंती स्पष्ट होईल. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा असून, जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनरचालकाने समोरून येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नाशिक पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून माणुसकीचे दर्शन घडवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR