36.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरनिकाल घसरल्याने चिंतन करावे लागेल

निकाल घसरल्याने चिंतन करावे लागेल

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. तर तो गेल्यावर्षी ९२.३६ टक्के लागला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात २.९० टक्यांनी घसरण झाली आहे. सदर घसरलेला निकाल सुधारण्यासाठी चिंता नाहीतर चिंतन करण्याची आम्हाला गरज असल्याची कबूली लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी व्यक्त केली.
इयत्ता १२ वी च्या परीक्षेत लातूर विभागीय शिक्षण मंडळाची गुणवत्ता व टक्केवारी वाढीसाठी आगामी काळात मुख्याध्यापक, शिक्षक, अधिका-यांच्या समवेत बैठका घेऊ, असे सांगून तेलंग म्हणाले की, दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षा नेहमी पेक्षा १० दिवस अगोदर घेतल्या. तसेच एक महिना अगोदर निकाल जाहिर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणे सोपे होणार आहे. प्रत्येक पेपरला विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक दिवसाचा खंड देण्यात आला.
लातूर विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ९१ हाज्तार ६११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ८० हजार ७७० विद्यार्थी पास उत्तीर्ण झाले आहेत. तर मंडळाचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. तसेच विज्ञान शाखेचा ९६.९१ टक्के, कला शाखेचा ७७.९८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.३० टक्के, व्यवसाय अभ्यास क्रमाचा ७५.६३ टक्के, तर आयटीआय चा ८५.९७ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत ८५.९९ टक्के मुले, तर ९३.६३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR