21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनितीन राऊत यांच्या कारला अपघात

नितीन राऊत यांच्या कारला अपघात

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये बुधवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातामधून काँग्रेसचे नेते नितीन राऊत थोडक्यात बचावले. नितीन राऊत यांच्या वाहनाला बुधवारी रात्री ऑटोमोटिव्ह चौकावर अपघात झाला.

नितीन राऊत प्रचार संपवून त्यांच्या घराकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक कारच्या दरवाजाजवळ बसली. मात्र सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवत नियंत्रण कायम ठेवल्याने कार पलटली नाही.

कारला अचानक धडक बसल्याने कारमध्ये बसलेले नितीन राऊत आणि इतर सहका-यांना जोरदार धक्का बसला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. नितीन राऊत हेही या अपघातातून बचावले असून ते सुखरूप आहेत. अपघातानंतर राऊत यांच्या सहका-यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस या प्रकरणामध्ये अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR