लातूर : प्रतिनिधी
योग हा आपल्या देशाने जगाला दिलेला अनमोल ठेवा आहे. नियमित योगासनामुळे आपले तन आणि मन तांदरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्यकाने नियमितपणे योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. या कार्यक्रमात अंदाजे ६ हजार लातूरकर नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासान, लातूर शहर महानगरपालिका यांच्यासह पतंजली योगपीठ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हिंग सुप्रभात ग्रुप, नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, योगासन भारत आदींच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, लातृच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माले, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या नंदा बहेन, पतंजली योगपीठाचे राम घाडगे, राजभाऊ खंदाडे, डॉ. अशोक सारडा, डॉ. कलमे यावेळी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून योगाचे महत्व पटवून देण्यात आले. केशवराज माध्यमिक विद्यालय, देशिकेंद्र माध्यमिक विद्यालय, राजस्थान माध्यमिक विद्यालय, परिमल माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, सरस्वती माध्यमिक विद्यालय, शिवाजी माध्यमिक विद्यालय, सदानंद माध्यमिक विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, शारदा इंटरनॅशनल स्कूल, संत नामदेव माध्यमिक विद्यालय, यशवंत माध्यमिक विद्यालय, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, जिजामाता कन्या प्रशालेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रभातफेरी आणि योगाभ्यासात सहभागी झाले होते.