निलंगा : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथे आज दि. २९ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिर येथे महाभिषेक व पुजा, सकाळी ८.१५ वाजता दादा बाग सिंधखेड रोड येथे स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व मातोश्री वत्सलाबाई पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन, सकाळी ८.३० वाजता हजरत पीरपाशा दर्गाह येथे चादर व फुले वाहने आणि दर्शन, सकाळी ९ वाजता हुताम्मा स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व हुतात्मा स्तंभास अभिवादन, सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळांचे वाटप, सकाळी १०.१५ वाजता स्व.डॉ शिवाजीराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व फुले वाहून अभिवादन, सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालय निलंगा येथे वृक्षारोपण, सकाळी १०. ४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार, फुले वाहून अभिवादन, सकाळी ११ वाजता अशोक बंगला येथे शहरातून व बाहेर गावहून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अशोकराव पाटील निलंगेकर वाढदिवस समितीच्यावतीने प्रा. दयानंद चोपणे, प्रा.राजेंद्र सूर्यवंशी, लाला पटेल, अजित नाईवाडे, सिराज देशमुख, सुरेंद्र धुमाळ, गजानन भोपणीकर, देविदास पतंगे, व्यंकटराव शिंदे, अनिल अग्रवाल, प्रसाद झरकर,आबासाहेब पाटील, सुधीर लखनगावे, प्रकाश बाचके, अमोल सोनकांबळे, वीरभद्र आग्रे, अशोक शेटकार, नवनाथ कुंडुबले, भारत बियाणी, शिवाजी जाधव, सोनाजी कदम, सुदर्शन जागले, रमेश मोगरगे यांनी केले आहे.