36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeलातूरनिलंग्यात मराठा बांधवांचा रस्ता रोको

निलंग्यात मराठा बांधवांचा रस्ता रोको

निलंगा : प्रतिनिधी
मराठा  समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे कायदा पारित करू असे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करणा-या सरकारचा निषेध करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आला.
     मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने तालुक्यातील हलगरा, औराद, ताजपूर, मुगाव, मसाला, नागपूर-हैदराबाद महामार्गावर, मसलगा, हासोरी, भुतमूगळी, अशा विविध गावासह छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ह.भ.प. समाधान महाराज उमरगेकर यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीने सरकारचा निषेध केला. सकल मराठा समाज बांधव यांच्यातर्फे अजित माने, हरिभाऊ सगळे, किरण पाटील, प्रमोद कदम, राजाभाऊ साळुंखे, शंकर देशमुख यांनी सरकारचा निषेध करीत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीं तोपर्यंत आम्हीं स्वस्थ बसणार नाही अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. बागायत शेती करणारा माळी समाज हा आरक्षणाचा लाभ घेतोय परंतु कोरडवाहू शेती करणारा कुणबी हा मात्र आरक्षणापासून वंचित आहे. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल असे विचार यावेळी मांडण्यात आले.
रस्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी ईश्वर पाटील, किसनराव मोरे, विशाल जोळदापके, प्रदीप कदम, विनोद सोनवणे, धीरज शिंदे, परमेश्वर सोमवशी, बालाजी पाटील, संतोष घाडगे, महेश ढगे, अ‍ॅड तिरुपती शिंदे, अ‍ॅड दत्तात्रय सोळुंके, मंगेश गाडीवान, माधव वाडीकर, बालाजी पाटील, भगवान जाधव, रितेश तांबोळी,धीरज नागरगोजे, गणेश गंगथडे, राजेश पवार, दत्ता जाधव, दत्ता ढाले, पापा उमट्वाडे, राजेश पवार, सचिन पवार, संतोष मोघे, लक्ष्मण सोळुंके आदींनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांच्या वतीनेही लाला पटेल, साजिद पटेल,असलम झरेकर, शकील बागवान यांनी आंदोलनास पांिठंबा   दिला. दरम्यान निलंगा तालुक्यातील लातूर जहीराबाद रस्त्यावरील हलगरा, अनसरवाडा, केळगाव, गौर पाटी, मसलगा, मन्नथपूर, उमरगा (हा) येथे रास्तारोको करून सकल मराठा समाजाच्या वतीने  सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR