22.1 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रनिलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (२३ ऑक्टोबर) ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

गेले अनेक दिवस निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. आज अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. २०१९ ला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या सोबत ते भाजपमध्ये आले होते. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले. पक्ष हितासाठी जे करता येईल ते करणार आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहणार असल्याचे राणे म्हणाले. प्रेमापोटी ज्यांना ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे ते येणार असल्याचे राणे म्हणाले. कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेणार आहे. मी लहान कार्यकर्ता आहे, मला निवडणूक लढायची असल्याचे राणे म्हणाले.

राणे कुडाळ-मालवणमधून लढणार
निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या सोशल मीडियावरील भाजप चिन्हाचे असलेले पोस्टर्स हटवले आहे. आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह असलेले पोस्टर्स त्यांनी अपलोड केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR