25.1 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीत पैशांचा महापूर

निवडणुकीत पैशांचा महापूर

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पण तरीही पोलिसांच्या कारवाईमध्ये कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. मुंबईमध्ये आज साडेतीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुलेश्वरमधून २.३ कोटींची रोकड तर शिवडीतून एक कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय जालन्यातून ५२ लाख तर जळगावातून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. भुलेश्वर परिसरातून २.३ कोटींची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पैशासह १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. शिवडीमध्ये एका कॅबमधून १.१० कोटीचे सोने जप्त करण्यात आले. पोलिसांकडून याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.

जालन्यात ५२ लाख ८९ हजारांची रोकड जप्त
जालना शहरातील किरण पेट्रोल पंप परिसरात पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान ५२ लाख ८९ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जालना शहरातील बस स्टँड रोडवरील किरण पेट्रोल पंप येथे नाकाबंदी दरम्यान व्हॅगन आर कारच्या तपासणीमध्ये ५२ लाख ८९ हजारांची रक्कम गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आली. अभिजित मोहन सावजी (वय २४ वर्षे, रा. संभाजीनगर, जालना) असे वाहनचालकाचे नाव असून सदर संशयित व्यक्तीकडे नियमापेक्षा जास्तीची रक्कम निवडणुकीच्या काळात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील चालकाने या रकमेचा तपशील न दिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सदर रक्कम जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.

जळगावात बड्या राजकीय नेत्याची २५ लाखांची रोकड जप्त
जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात जळगावातील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद हिरामण पवार असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५००, २०० तसेच १०० च्या नोटांची सुमारे २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सोलापूरमध्ये २० लाखांची रोकड जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी १२ कारवाया केल्या. यामध्ये ४ बनावट पिस्तूल आणि २० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत या कारवाया करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR