निवडणूक आयोग भाजपच्या इशा-यावर चालतोय

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा मनुवाद्यांच्या आणि भाजपच्या इशा-यावर चालत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत ५ लाख मतदार वाढले. लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या ६ महिन्यांत ५० लाख मतदार कसे वाढले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेवेळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसे झाले? याचे कुठलेही उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही. भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याने निवडणूक आयोगाची स्वायत्तता नष्ट झाली. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार आहे. यामुळे आयोगाच्या कृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदारदिनी काँग्रेसकडून बसस्थानक चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

भाजपचे किरीट सोमय्या कुठली चांदणी वा तारा आहे हे कळायला मार्ग नाही. सोमय्या नाटकातील सोंगाड्या असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. आवश्यक त्या ठिकाणी त्याला पुढे केले जाते. काम झाले की त्यांचे कपडे काढून टाकले जातात. त्यामुळे त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही असे वडेट्टीवार म्हणाले. ज्यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले ते सगळे मंत्रिमंडळात मंत्री असून सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यांनी आरोप करायचे आणि भाजपने त्यांना उचलून घ्यायचे अशा बेइमान लोकांना महत्त्व देण्याची गरज नाही.

हिंदूंना मूर्ख बनवून व्होट घ्यायचे
ज्या दिवशी भाजप हिंदू-मुस्लिम आणि मंदिर आणि मशीद यांचे राजकारण बंद करेल त्या दिवशी भाजपचे अध:पतन झाले असेल. भाजप केवळ मतांसाठी हिंदू- मुस्लिम, मंदिर-मशीद, भारत-पाकिस्तान, व्होट जिहाद करीत आहे. हिंदूंना मूर्ख बनवून व्होट घ्यायचे हा एकमेव धंदा भाजपचा आहे. मुख्यमंत्री दावोसला जाऊन आलेत मात्र झालेले करार हे महाराष्ट्रातीलच कंपन्यांसोबत आहेत. महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला जात आहेत त्यावेळेस हे गप्प का बसत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.

लढ म्हटले की आम्ही लढायला तयार
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विषयावर बोलताना हा प्रश्न हाय कमांडचा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. प्रदेशाध्यक्ष कधी द्यायचा? कोण करायचे? हे हायकमांड ठरवीत असते. याचे उत्तर माझ्याकडे नाही. प्रदेशाध्यक्षासाठी आपण इच्छुक आहात का? यावर बोलताना हाय कमांड निर्णय घेईल त्यांनी लढ म्हटले की आम्ही लढायला तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news