26.5 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरनिवडणूक मनुष्यबळाचे दुसरे सरमिसळीकरण पूर्ण 

निवडणूक मनुष्यबळाचे दुसरे सरमिसळीकरण पूर्ण 

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाचे दुसरे सरमिसळीकरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांचा समावेश असलेली पथके गठीत करून त्याचे विधानसभा मतदारसंघ निहाय वाटप करण्यात आले.
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक सामान्य निरीक्षक डॉ. करुणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी तथा मनुष्यबळ व्यवस्थापन नोडल अधिकारी अहिल्या गाठाळ, टपाल मतपत्रिका नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संगीता टकले, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप डूमणे यावेळी उपस्थित होते. मतदान केंद्रांवर नियुक्त प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष, एक प्रथम मतदान अधिकारी आणि दोन इतर मतदान अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात ३०९ मतदान केंद्रांसाठी ३४४ मतदान पथके, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३६३ मतदान  केंद्रांसाठी ४०३ मतदान पथके,  लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ३८९ मतदान केंद्रांसाठी ४३२ मतदान पथके, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ३७६ मतदान केंद्रांसाठी ४१९ मतदान पथके, उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात ३५९ मतदान केंद्रांसाठी ३९९ मतदान पथके, निलंगा विधानसभा मतदारसंघात ३४७ मतदान केंद्रांसाठी ३८६ मतदान पथके गठीत करण्यात आली आहेत. यानंतर तिस-या सरमिसळीकरण प्रक्रीयेनंतर या पथकांना मतदान केंद्राचे वाटप केले जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR