28.3 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeलातूरनिवडणूक लातूरच्या सर्वसामान्य माणसाची, त्यांच्या हक्कासाठी जिंकायची 

निवडणूक लातूरच्या सर्वसामान्य माणसाची, त्यांच्या हक्कासाठी जिंकायची 

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वधर्मसमभावाची असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भुमिका आहे. विरोधक प्रत्येक निवडणुकीत तेच तेच मुद्दे बोलतात. याकडे लक्ष न देता लातूरला आपणाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. गेल्या पाच वर्षात २४०० कोटीचा निधी, लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही खेचून आणला आहे. ही निवडणूक लातूरच्या सर्वसामान्य माणसाची आहे, आणि त्यांच्या हक्कासाठी जिंकायची आहे, असे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर शहरातील सुभाष चौकातील हाजी मुमताज पटेल, हाजी आरिफ पटेल यांच्या सिटी वॉक फूटवेअरला दि. १ नोव्हेंबर रोजी भेट देऊन त्यांच्याशी सध्याचा व्यापार, जीएसटी आदी विविध विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी महापौर दीपक सूळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, शफिक शेख, हाजी इसाक पटेल, निसार पटेल, सोहेल पटेल, आसिफ पटेल, इरशाद पटेल, अशोक भोसले, अहेमदखा पठाण,  विजय देशमुख, रईस टाके, चांदपाशा इनामदार, सिकंदर पटेल, गिरीश ब्याळे, इम्रान सय्यद, युनूस मोमीन सचिन बंडापल्ले, खलील चौधरी, आबु मणियार, हानीफ मदरासी, फैजल कायमखानी, अभिषेक पतंगे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी पटेल कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित
होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वधर्मसमभावाची असून सर्वांनासोबत घेऊन जाण्याची भुमिका आहे. लातूरला आपणाला आणखी पुढे घेऊन जायचे आहे.  विरोधक प्रत्येक निवडणुकीत तेच तेच मुद्दे बोलतात २४००  कोटीचा निधी, लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही खेचून आणला आहे. ही निवडणूक लातूरच्या सर्वसामान्य माणसाची आहे आणि त्यांच्या हक्कासाठी जिंकायची आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्र विकला जात आहे, राज्यातील जमीन उद्योगपतींना विकली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेला महाविकास आघाडीला जे यश मिळाले त्यापेक्षा अधिक यश विधानसभेला मिळेल, महाविकास आघाडीने १३ अल्पसंख्याक समाज बांधवांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. महायुती  सरकार धर्मा, धर्मात भांडणे लावून षडयंत्र रचत आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर राज्यात यावर कायदा करण्यात येईल. कोरोना काळात लातूरतील एकही भाजप पदाधिकारी लोकांच्या मदतीला आला नाही. काँग्रेस नगरसेवक लोकांची मदत करताना मृत्युमुखी पडले. लातूरला मराठवाड्यातील एक नंबर शहर आपणाला बनवायचे आहे. काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळत आहे लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व सहा उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR