30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeलातूरनूतन वर्षानिमित्त जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना दिल्या शुभेच्छा

नूतन वर्षानिमित्त जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना दिल्या शुभेच्छा

लातूर : प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा बँकांत टॉप ३ मध्ये असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना बंगल्यावर सोमवारी लातूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळाने नूतन वर्षानिमीत्ताने भेट घेवून दिलीपराव देशमुख यांचा बुके पुष्पहार देवुन शुभेच्छा दिल्या. लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांत अनेक चांगले निर्णय घेत शेतक-यांना व पगारदार सभासदांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजना राबवून मराठवाडयात व विदर्भात जिल्हा बँकात अव्वलस्थानी राहिली आहे.

नविन वर्षाचा पहिला दिवस त्या निमित्ताने जिल्हा बँकेचे संचालक मंडळाने नूतन वर्ष निमीत्ताने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी संचालक मंडळास मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, अशोकराव गोविंदपूरकर, एन. आर. पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, दिलीप पाटील नागराळकर, जयेश माने, मारोती पांडे, अनुप शेळके, संचालीका सौ स्वयंप्रभा पाटील, संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई भोसले, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR