तेल अवीव : वृत्तसंस्था
गाझामध्ये ६ इस्राईली लोकांची हत्या केल्यामुळे इस्रायलचे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. या ओलिसांच्या हत्येविरोधात इस्रायलमधील बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या विरोधात लोकं तीव्र संताप व्यक्त करत आहेत. लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने गाझा पट्टीतून सहा इस्रायली व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर देशात निदर्शने सुरू झाली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ४८ ते ७२ तास आधी या ओलिसांची हत्या करण्यात आल्याची माहित आहे.
हमासचे नेते खलील अल-हय्या यांनी ओलीसांच्या मृत्यूसाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना जबाबदार धरले आहे. ‘नेतन्याहू आणि त्यांचे अतिरेकी सरकार हे ओलीसांच्या मृत्यूचे कारण आहे.’ असे अल हय्या यांनी म्हटलंय. ७ ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या २५१ लोकांपैकी ९७ अजूनही गाझामध्ये असल्याचे मानले जाते, आतापर्यंत ३३ मृत्यूची पुष्टी केली आहे.
तेल अवीव, जेरुसलेम आणि इतर शहरांमध्ये निदर्शने झाली. इस्रायली लोकांच्या हत्येचा त्यांनी तीव्र निषेध करीत जनतेने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि प्रशासनाविरुद्ध राग व्यक्त केला. एकंदरीत पंतप्रधान नेतन्याहू यांची खुर्ची धोक्यात असल्याचे मानले जात आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हमासने गाझा पट्टीत ६ इस्रायली लोकांना ठार केले आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने गाझा पट्टीतून सहा मृत इस्रायली व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेनंतर देशात निदर्शने सुरू झाली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ४८ ते ७२ तास आधी या ओलिसांची हत्या करण्यात आली.