28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरपूरला जाणा-या भाविकांच्या बसला अपघात, ५ ठार

पंढरपूरला जाणा-या भाविकांच्या बसला अपघात, ५ ठार

नवी मुंबई : प्रतिनिधी
डोंबिवलीहून पंढरपूरच्या दिशेने जाणा-या खासगी बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला. या बसमध्ये ५४ भाविक होते. या अपघातात त्यातील ५ भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबांना ५ लाख रुपये मदत जाहीर केली तर जखमींना मोफत उपचार देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली. तसेच अपघातातील जखमी व्यक्तींना मोफत उपचार दिले जाणार आहेत. हे सर्व उपचार राज्य सरकाच्या वतीने मोफत करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये जखमी रुग्णांची भेट घेत ही मदत जाहीर केली.

अपघातातील जखमींची, तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची पोलिस चौकशी करतील आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल. तपासनंतर जे समोर येईल, त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सोमवारी रात्री भरधाव ट्रॅक्टरने बसला दिलेल्या धडकेनंतर बस दरीत कोसळली. त्यामुळे हा अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर हा अपघात झाला. बसमधून ५४ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४० जणांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR