लातूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणा-या गोर-गरीब भावीकांच्या सोयीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे मोफत पंढरपूर यात्रा वारकरी सेवा याही वर्षी येथील सत्संग प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने मोफत बस सेवेअंतर्गत ३१ बसेसची सोय करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रेसाठी आज दि. ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील मध्यवर्ती बसस्थानक क्र. १ येथून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भाविकांना पंढरपुर आषाढी वारीकरीता वारक-यांना मोफत एस. टी. बस यात्रा व भोजन सेवा दिली जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणुन लातूर अर्बन को-ऑप. बँकेचे चेअरमन आकाश राठी, आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, मारवाडी युवा मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास राठी, तेलंगणा गीता परिवाराचे संचालक जुगल बियाणी उपस्थित राहणार आहेत.
भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारीक, सचिव चंदुसेठ लड्डा, रमेश भुतडा, शाम मुंदडा, केतन हलवाई, लक्ष्मीकांत बियाणी, रमेश राठी, मधुसूदन भूतडा, अशोक गोविंदपूरकर, दिलीप माने, लक्ष्मणराव मोरे, निलेश ठक्कर, शैलेश लाहोटी, प्रकाश कासट, रमेश बियाणी, मकरंद सावे, सुरेश मालु, लक्ष्मीकांत सोमाणी, अशोक अग्रवाल, इर््श्वर बाहेती, अशोक भोसले, रामानूज रांदड, जुगलकिशोर झंवर, अॅड. बळवंत जाधव, राजा मणियार, छोटू गडकरी, नंदकिशोर मूंत्री व सर्वश्री सत्संग प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी केले आहे.