मुंबई : प्रतिनिधी
अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी झाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक यांनी भीतीपोटीच पक्षांतर केले. अजित पवारांनीही किंवा आमच्या पक्षातून जे लोक भाजपमध्ये गेले, त्यांनीही भीतीपोटीच पक्ष सोडला, असा आरोप ठाकरे गटाचे राऊत यांनी केला.
दरम्यान, रवींद्र धंगेकर हे सुरुवातीला शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश केला. ते चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांनी सांगितले की विकासकामे होत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, म्हणून मी शिंदे गटात चाललो आहे. पण मला एक कळत नाही की शिंदे गटात गेल्यामुळे महाराष्ट्रातली किंवा त्यांच्या कसबा मतदार संघातील कोणती विकासकामं मार्गी लागणार आहेत? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात हे जे प्रवेश सुरू आहेत ते सरळसरळ भीतीपोटी झाले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक यांनी भीतीपोटीच पक्षांतर केले. रवींद्र वायकरांचेसुद्धा असेच एक प्रकरण होते. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांनी पक्षांतर केल्यावर ताबडतोब २४ तासांतच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले, आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता फोडण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली,.
धंगेकरांना पत्नीच्या अटकेची भीती
रवींद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून खरोखर सांगावे, असे आव्हान राऊतांनी दिले. धंगेकरांनी पक्ष सोडावा असे वातावरण तयार करण्यात आले, त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली. त्याच भीतीपोटी, विकासकामे रखडली या सबबीखाली रवींद्र धंगेकर हे शिंदे गटात गेले, असा आरोपही राऊतांनी केला.