24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरपत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्राध्यापक पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्राध्यापक पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

लातूर : प्रतिनिधी
जुळ्या मुली झाल्यामुळे वंशाचा दिवा मुलगा असावा म्हणून सतत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन पत्नी आजारी पडल्यानंतरही तिच्यावर उपचार न करता तिला तिच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी येथील एका प्राध्यापक पतीसह सासरच्या सहा जणा विरुद्ध अखेर चार महिन्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड येथील मुरलीधर वाघमोडे यांची मुलगी ज्योती हिचा विवाह लातूर शहरातील काथवटेनगर नवीन रेनापुर नाका येथील विश्वनाथ उर्फ राजू गंगाधर बुरले यांच्याशी २००३ मध्ये झाला होता. विवाहाच्या काही महिन्यातच विश्वनाथ बुरले यांनी आपली पत्नी ज्योती हिला मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून त्रास देणे सुरु झाले. रेणापूर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात प्राध्यापक पदावर काम करणा-या विश्वनाथ बुरले यांनी आपल्याच घरात आपल्या पत्नीचा मानसिक छळ इतका केला की ती स्वत: मरणास तयार झाली पाहिजे.
पतीच्या आणि सासरच्या मंडळींच्या छळामुळे ज्योती सतत आजारी पडू लागली. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्योतीची प्रकृती खालावल्याने तिला लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यावेळी पती प्रा. विश्वनाथ बुरले तिला दवाखान्यात भरती करणे ऐवजी तू कुठेही मरून जा असे सांगून निघून गेला होता. परंतु तिची प्रकृती जास्तच खालावल्याने तिने आपल्या दोन्ही भावाला फोन करून सांगितल्यान. तिच्या भावानी लातूर येथे धाव घेऊन तिला हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात हलवले होते. त्याची माहिती फिर्यादी भाऊ प्रसाद वाघमोडे याने त्याचा मेव्हणा प्रा. विश्वनाथ बुरले यास दिली. परंतू, प्रा. बुरले याने आजारी पत्नीची एकदाही भेट घेतली नाही. उपचारादरम्यान २०  मार्च २०२४ रोजी ज्योतीचा मृत्यू झाला.
आपल्या बहिण्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तिचा व सासरच्या मंडळी विरुद्ध मयत ज्योतीचा भाऊ प्रसाद वाघमोडे यांनी लातूर येथील  विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन प्रा. विश्वनाथ उर्फ राजू बुरले, ननंद सावित्री हालसे, नंदवई उद्धव हालसे, पुतण्या धनराज बुरले, युवराज बुरले आणि माणिक बुरले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त  केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR