27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरपदोन्नती मिळालेल्या पोलिस अधिका-यांचा सत्कार 

पदोन्नती मिळालेल्या पोलिस अधिका-यांचा सत्कार 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलिसांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा एसपी कन्स्ट्रक्शनचे अभियंता यासीन महेबुब शेख यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  लातूर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या मुख्तार इब्राहीम शेख, अरुण मारुती तलवार, रामचंद्र भानुदास ढगे, पंडित लक्ष्मणराव भंडारे, आवेज काजी यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली.
 त्यानिमित्त त्यांचा शाल, पुष्पहार व पेढा भरवत सत्कार करण्यात आला. एसपी कन्स्ट्रक्शनच्या महात्मा गांधी चौकातील कार्यालयात झालेल्या या सत्कार समारंभास सेवा निवृत्त पोलीस अधिकारी महेबुब गल्लेकाटू, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, बालाजी पिचारे, मासूम खान, बाबा शेख, नितीन कांबळे, जहिर शेख, आबु शेख, बरकत काजी, जमील नाना, मारुती चव्हाण, मौलाना सादिक शेख, साबीर देशमुख यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR