32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानवर तब्बल ३० अब्ज डॉलर्सचे कर्ज!

पाकिस्तानवर तब्बल ३० अब्ज डॉलर्सचे कर्ज!

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
युद्धामुळे महासंकटात सापडलेल्या पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या कुबड्यांवर सुरू आहे. १९५८ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतले होते, तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल २४ वेळा पाकिस्तानने आयएमएफकडे कर्जासाठी हात पसरले आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानने इतर परदेशी बँकांकडून देखील मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. सध्या पाकिस्तानवर तब्बल ३० बिलियन डॉलर एवढे कर्ज आहे आणि त्यांना पुढील दोन वर्षांमध्ये ते परतफेड करावे लागणार आहे. पण पाकिस्तानची सध्याची स्थिती पाहता ते दोन वर्षांत कर्ज फेडू शकणार नाहीत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. प्रत्यु्त्तर म्हणून भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले. मात्र तरीदेखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. दरम्यान आयएमएफकडून पु्न्हा एकदा पाकिस्तानला १०० कोटी डॉलरचे कर्ज देण्यात आले. आधीच पाकिस्तान कर्जबाजारी झाली आहे. त्यात आयएमएफचे १०० कोटी डॉलर्सचे कर्ज यामुळे पाकिस्तान पूर्णपणे कर्जात बुडाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला पुढील दोन वर्षांत हे सर्व कर्ज फेडायचे आहे. त्यामुळे कंगाल पाकिस्तानच्या अडचणी वाढणार् आहेत.
खरे तर भारत आणि पाकिस्तानला एका दिवसाच्या अंतराने स्वातंत्र्य मिळाले. मात्र, भारताने आज मोठी भरारी घेतली तर पाकिस्तानला दहशतवादाने पोखरून काढले आहे. दहशतवाद आणि अंतर्गत कलहामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. सध्या त्यांची विदेशी गंगाजळी बांगलादेशपेक्षाही कमी आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून तसेच इतर राष्ट्रांकडून जे फंडिंग मिळाले, ते विकास करण्यासाठी मिळाले. मात्र पाकिस्तानने त्याचा उपयोग दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला. त्यामुळे पाकिस्तान कर्जबाजारी बनला आहे.

युद्धात अब्जावधी
डॉलर्सचा फटका
पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. एअरस्पेस आणि विमानतळ बंद असल्याने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची गती एकदम मंदावली. भारत-पाक संघर्षादरम्यान पाकिस्तानला अनेक अब्ज डॉलरचे नुकसान झाले. अर्थात अजून अधिकृत आकडेवारी काही समोर आली नाही. पण पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या विशेष पॅकेजची पाकिस्तान वाट पाहत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR