26.9 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानी फायटर जेट बांगला देशामध्ये तैनात?

पाकिस्तानी फायटर जेट बांगला देशामध्ये तैनात?

ढाका : वृत्तसंस्था
पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानही गप्प बसणार नाही. यावेळी विमाने एका नव्हे तर दोन्ही सीमेवरून उडतील, असे एका पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले आहे.
पाकिस्तानी वाहिनी समा टीव्हीच्या पॉडकास्टमध्ये जावेद फारुकी नावाच्या एका पत्रकाराने म्हटले आहे की, पाकिस्तानची लढाऊ विमाने बांगलादेशात तैनात आहेत. जर काही घडले तर यावेळी विमाने एका सीमेवरून नव्हे तर दोन सीमेवरून उडतील. भारताने हा भागा ज्या पद्धतीने आपल्या नियंत्रणात ठेवला होता. आता तसे नाही. सिक्योरिटी आता त्यांच्या हातात नाही. नेपाळ आणि म्यानमारसारखे देशही भारतावर नाराज आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR