25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानी संसदेच्या सुरक्षेसाठी मांजरांची तैनाती, बजेट १२ लाख

पाकिस्तानी संसदेच्या सुरक्षेसाठी मांजरांची तैनाती, बजेट १२ लाख

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. लोकांकडे खायला पैसे नाहीत. सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. आता पाकिस्तान सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी दहशत निर्माण केली आहे. पाकिस्तानी संसद उंदरांमुळे त्रस्त आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले. आता पाकिस्तानी संसद उंदरांना संपवण्यासाठी मांजरांची नियुक्ती करणार आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेने या योजनेसाठी बजेटमध्ये १२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेनुसार विशेष प्रशिक्षित मांजरांना संसद परिसरात ठेवण्यात येईल. उंदीर पकडून त्यांना मारणे हेच त्यांचे एकमेव काम असेल. पाकिस्तानच्या संसदेत उंदरांची संख्या इतकी वाढली आहे की, त्यामुळे कामकाज प्रभावित होत आहे. उंदरांमुळे पाकिस्तानी संसदेत काही महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले आहे.

या मांजरांना उंदरांना पकडून संपवण्याच ट्रेनिंग दिली जाईल. त्यांना संसद परिसरात ठेवलं जाईल. ही योजना अनेकांना गमतीशीर वाटत आहे. पण एका गंभीर समस्येवर हा उपाय आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांची समस्या या आधी सुद्धा होती. पण आता हा प्रॉब्लेम इतका वाढलाय की, त्यावर तात्काळ तोडगा आवश्यक आहे. मांजर तैनातीची योजना लवकरच अंमलात येईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR