पाकिस्तानला जॅकपॉट; मिळाला सोन्याचा साठा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळलेली असून, रोख रकमेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आाहे. त्यातच बेरोजगारीचा दरही १.५ टक्क्यावरून ७ टक्क्यांवर गेला आहे. इतकी वाईट स्थिती असताना पाकिस्तानचे नशीब सध्या फळफळले आहे. पाकिस्तानच्या अटक शहरात तब्बल १७ हजार कोटी रुपये किमतीचा सोन्याचा साठा सापडला आहे. ३२ किलोमीटर परिसरात ३२,६५८ किलो (२८ लाख तोळे) सोने सापडल्याचा दावा पाकिस्तानातील पंजाब राज्याचे माजी खाण मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केला आहे. यामुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे ते म्हणाले.

इब्राहिम हसन मुराद यांनी एक पोस्ट केली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा शोध पंजाबमधील नैसर्गिक संसाधनांच्या प्रचंड साठ्यावर प्रकाश टाकतो. पथकाने या ठिकाणाहून १२७ ठिकाणचे नमुने घेतले. हा शोध पाकिस्तानची खनिज संपत्ती समोर येण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करताना भावी पिढ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानी चलनात या सोन्याची किंमत ८०० अब्ज रुपये इतकी आहे. यामुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते.

दरवर्षी ५ लाख लोक गरिबीत
पाकिस्तानच्या जीडीपीचा विकास दर देशातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा आहे. सध्या पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर भारत आणि बांगलादेशपेक्षा जास्त आहे. येथे महिलांना नोकरीच्या संधी मिळवण्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. लोकसंख्येच्या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण आणि इतर आवश्यक गरजांशी संबंधित समस्या सोडवणे कठीण झाले असून, दरवर्षी ५ लाख लोक गरिबीत जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पाकिस्तानला रोजगाराच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दरवर्षी १.५ दशलक्ष नोक-यांची आवश्यकता आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news