25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रपालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

पालघर : जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये ३.६ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. शनिवारी साडेसहाच्या सुमारास हे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पालघरमध्ये ६ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचे धक्को बसले. पालघरच्या डहाणू, कसा, गांजड आणि इतर परिसरामध्ये सकाळी ६ वाजून ३५ मिनिटे ४१ सेकंदांनी भूकंपाचे धक्के बसले असून त्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. हे धक्के १० किलोमीटर खाली होते, तर १९.८७ अक्षांश आणि ७२.७६ रेखांश दिशेला तसेच मुंबई व नाशिक आणि गुजरातमधील वापीपासून हा भूकंपाचा केंद्रबिंदू जवळ होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती जाहीर करण्यात आली आहे,

पालघर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे काही घरांना हादरे बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR