पालम : आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहर पोलीस ठाण्यापासून तहसील कार्यालय पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. दरम्यान पालम तालुक्यात देखील बंद पुकारण्यात आला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी सकाळ पासूनच व्यापारी प्रतिष्ठाने उघडली नव्हती त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता.
तालुक्यातून समाज बांधवांनी सकाळी एकत्र येत शहर पोलीस ठाण्यात सपोनि. मारोती कारवार, दिनेश सूर्यवंशी यांनी निवेदन स्विकारले. त्यानंतर येथून निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली शनिवार बाजार, पेठपिंपळगांव चौकमार्गे तहसील कार्यालयात गेली. यावेळी आ. पडळकर यांच्यावरील हल्लयाच्या विरोधात घोषणाबाजी करून घटनेचा नोदविण्यात आला. हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर माजी सभापती गणेशराव घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष असद खान पठाण, नगरसेवक ज्ञानराज घोरपडे, कऊबा संचालक माऊली घोरपडे, माजी नगरसेवक विजय घोरपडे, मंगेश घोरपडे, सरपंच भास्कर लांडे, अतुल धुळगुंडे, मंगेश दयाळ, सुदाम घोरपडे, अक्षय गडगिळे, साहेब वाघमारे, विनोद घोरपडे, होनाजी घोरपडे, चेतन बाळासाहेब लांडे, भागवत हाके, राजू वाघमारे, संदीप घोरपडे, सुभाष आव्हाड, गणेश शेंगोळे, भागवत लेवडे, बसवेश्वर लिंगायत, निलेश घोरपडे, रंजीत सिरस्कर, दत्ता रोकडे, विक्रांत घोरपडे, मुंजाजी घोरपडे, आकाश कऊटकर, दौलत शेंगुळे, तानाजी पैके, अविनाश घोरपडे आदी उपस्थित होते.