27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूर पीएम किसानची २८७ शेतक-यांची केवायसी रखडली

 पीएम किसानची २८७ शेतक-यांची केवायसी रखडली

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८९ आधार सिडींग तर २८७ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने संबंधित शेतक-यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) मिळणा-या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे संबंधित शेतक-यांंनी तातडीने त्यांचे बँक खाते आधार क्रमांकासोबत संलग्न करून घेण्याची गरज आहे.
     पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही अल्प भूधारक शेतक-यांंसाठी लाभ देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात असून थेट शेतक-यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जात असल्याने शेतक-यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो मात्र यासाठी आधार सिडींग व ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली, परंतु अजुनही अनेक  शेतक-यांची आधार सिडींग व ई-केवायसी करणे बाकी आहे.
     दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यात २८९ आधार सिडींग तर २८७ शेतक-यांनी बँक खाते आधार क्रमांकाची ंिलक केलेले नाही.त्यामुळे अनुदान वाटपासह इतर कार्यालयीन प्रक्रियेत अडचणी येत आहेत. या अडचणी येत असल्या तरी या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतक-यांनी अद्यापही बँक खात्याचे आधार क्रमांक ंिलक केलेला नाही.यासंदर्भात कृषी विभागाने अनेक वेळा जनजागृती केली व सूचनाही केल्या,परंतु अजूनही तालुक्यातील शेतक-यांचे ई- केवायसी आणि बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यात आलेले नाहीत. त्या मुळे या शेतक-यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.  तालुक्यातील ज्या शेतक-यांंची अद्यापही आधार सिडींग व ई-केवायसी बाकी आहे.त्यांना पीएम किसान अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे बाकी राहिलेल्या शेतक-यांंनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार सिडींग व ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR