पीडित कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस सर्व पातळ्यांवर लढत राहील

लातूर : प्रतिनिधी
बीड, परभणी येथील पीडित कुटूंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसपक्ष सर्व पातळ्यांवर लढत राहील, अशी भुमिका राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमासमोर मांडली.  परभणी येथे काही दिवसांपूर्वी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २३ डिसेंबर  रोजी दुपारी परभणी शहरातील नवा मोंढा येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सुर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे येऊन सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली सांत्वन केले, तत्पूर्वी या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन एकूण घटनाक्रम जाणून घेतला, बीड असो की परभणी या जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सर्व पातळयांवर लढत राहील, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली.  महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारवर काँग्रेस पक्षाच्यावतीने दबाव निर्माण केला जाईल, असेही यावेळी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news