23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरपीव्हीआरमध्ये २५ चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद

पीव्हीआरमध्ये २५ चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी
गेले चार दिवस लातूरकरांना देश-विदेशातील कलात्मक चित्रपटांची मेजवानी देणारा दुसरा लातूर इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल दि. १८ फेब्रुवारी रोजी  झाला. झेक रिपब्लिकचा ‘सेन्सेटिव्ह पर्सन’ या चित्रपटाने फेस्टिवलचा समारोप झाला. ‘पीव्हीआर’ थिएटरमध्ये झालेल्या या महोत्सवात २५ चित्रपट दाखविण्यात आले. लातुरकरांनी महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासन, विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने लातूरात हा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला. फेस्टिवलचे उद्घाटन बल्गेरियन चित्रपट ‘ब्लागाज लेसन’ या चित्रपटाने झाले. वरील चित्रपटासह एकूण २५ चित्रपट या चार दिवसाच्या महोत्सवात दाखवले गेले. यापैकी जयंत सोमालकर दिग्दर्शित ‘स्थळ’ व सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ हे दोन मराठी चित्रपट या फिल्म फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण होत. याशिवाय भारतीय भाषा विभागातील चार चित्रपट तसेच ग्लोबल सिनेमा विभागात सोळा चित्रपट होते. त्याचबरोबर दोन गाजलेले माहितीपटपण या महोत्सवात दाखविण्यात आले. ग्लोबल सिनेमा विभागात युरोपियन, उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया व आशियाई देशांमधील विविध भाषांमधील सोळा चित्रपट महोत्सवात निवडण्यात आले. अन्न, वस्त्र व निवार्यासाठी होणारी स्थलांतरे व त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम तसेच पर्यावरण हानी आणि मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत व स्त्री- पुरुष संबंध असे विविध विषय हाताळणारे हे चित्रपट होते.
राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचे प्राचार्य डॉ. बोकाडे व प्रोफेसर डॉ. संजय देशमुख तसेच पुणे फेस्टिवलचे  समर नखाते, उपसंचालक विशाल शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहूण्याचा सत्कार करण्यात आला. या समारंभाला विलासराव देशमुख फाऊंडेशनचे प्राचार्य डॉ. बी. एस. वाकूरे, प्राचार्य डॉ. एम. व्ही. बुके, प्राचार्य राजकूमार साखरे, श्रीमती उषाकिरण सूद, अभिजात फिल्म सोसायटीचे सर्वश्री जितेंद्र पाटील, शाम जैन, ज्ञानेश्वर चौधरी, धनंजय कुलकर्णी, डॉ. विश्वास शेबेकर, स्वप्नील देशमुख, अभिषेक बुचके, आदित्य कुलकर्णी, प्रणाली कोल्हे, देवयानी बागल आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR