20.4 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात घरात घुसून महिलेवर अत्याचार

पुण्यात घरात घुसून महिलेवर अत्याचार

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून अत्याचाराच्या चार घटना समोर आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी बोपदेव घाटामध्ये तरुणीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर वानवडीमधील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला.

कोंढवा परिसरात एका चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली. आता सलग चौथी घटना समोर आली असून वारजे माळवाडी परिसरातील महिलेवर तिच्या घरात घुसून एकाने अत्याचार केला.

पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पुण्यात सातत्याने घडणा-या अत्याचाराच्या या घटनांमुळे महिला-मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहिला नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीने ३६ वर्षीय महिलेवर जबरदस्ती केल्याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR