धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर यांचे मंगळवार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर धाराशिव शहरातील कपिलधार स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या बहिण तर माजी राज्यमंत्री भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या आत्या होत. अमोल पाटोदेकर यांच्या त्या आई होत्या. पुष्पाताई पादोडेकर यांनी धाराशिव शहराचे नगराध्यक्ष म्हणून काम केले. तसेच भारत स्कॉउट आणि गाईडच्या अध्यक्षा होत्या. महिला मंडळ यासह विविध सामजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात योगदान दिले आहे.