25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयपूजा खेडकरला ‘उच्च’ दिलासा, न्यायालयाने अटकेला दिली स्थगिती

पूजा खेडकरला ‘उच्च’ दिलासा, न्यायालयाने अटकेला दिली स्थगिती

नवी दिल्ली : अपंग कोट्याचा लाभ मिळवून फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिस आणि यूपीएसी यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.

आता पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. दरम्यान, खेडकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, तर यूपीएससीतर्फे नरेश कौशिक यांनी हजेरी लावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR