15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeपरभणीपूर्णा येथे पेन्शन घोटाळ््यावरून ९ जणांवर गुन्हा

पूर्णा येथे पेन्शन घोटाळ््यावरून ९ जणांवर गुन्हा

कोट्यवधींचा घोटाळा
पूर्णा : पूर्णा पंचायत समिती कार्यालय अंतर्गत लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेंशनमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण सप्टेंबर २०२४ मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी मंगळवार, दि. ७ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात १ कोटी ८४ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन येथील पंचायत समितीच्या दोन गटविकास अधिका-यांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

पूर्णा येथील पंचायत समिती कार्यालयात लेखा विभागातील कर्मचा-यांनी ऑगस्ट २०२१ ते मे २०२३ या काळात सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेंशन योजना, भविष्य निर्वाह निधीत पंचायत समितीच्या लेखा विभागातील कर्मचा-यांनी बोगस कागदपत्रे तयार करून सदरील रक्कम एका एजन्सीच्या नावे बँकेत टाकून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे केली होती. ही बाब काही दिवसांपूर्वीच लेखा परीक्षणानंतर उघडकीस आली.

या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वतीने चौकशी करून मंगळवारी रात्री उशिरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आंदेलवाड यांच्या फिर्यादीनुसार वरिष्ठ सहाय्यक एम. बी. भिसे, सहाय्यक लेखा अधिकारी एस. के. पाठक, तत्कालीन गटविकास अधिकारी सुनिता वानखडे व जे. व्ही. मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरिंग, शेख अझहर शेख समद या सर्वांनी संगनमत करून एकूण १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ रुपयाचा अपहार केल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पो. नि. विलास गोबाडे हे करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR