बीड : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून बीड पोलिस राज्यभरात चर्चेत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलिसांवर राज्यभरातून टीका सुरू आहेत. दरम्यान, आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बीड पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनंत मारोती इंगळे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
इंगळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजूनही समोर आलेले नाही. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले असून १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड केज पोलिस ठाण्यात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचा-याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.